Aapli News

नारायणगाव मध्ये शेतकरी मेळावा: आधुनिक शेतीच्या नवीन दिशा, डॉ. प्रशांत गवळी यांचे मार्गदर्शन

Go Farmly च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवसंजीवनी

 

पुणे / नारायणगाव| प्रतिनिधी

समर्थ क्रॉप केअरचे संचालक डॉ. प्रशांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगावमधील गो फार्मली कार्यालयाजवळ भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्दिष्ट होते की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल आणि शेतीमध्ये किफायतशीरतेने उत्पादन कसे वाढवता येईल यावर चर्चा करणे.

प्रशांत गवळी यांनी आपल्या साध्या भाषेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पारंपरिक पद्धतींमधून बाहेर येत, कसे आधुनिक शेती तंत्र अंगीकारता येईल, त्यातून नफ्याचे गणित कसे उभे करता येईल याचे मार्गदर्शन त्यांनी केले. शेतीचं योग्य मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कसे करावे याचेही सखोल मार्गदर्शन यावेळी त्यांनी दिले.

त्यांनी Go Farmly अ‍ॅप बद्दल माहिती देताना, शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे फायदे सांगितले. शेती उत्पादनांची विक्री, ट्रेडिंग आणि कायदेशीर बाबतीत खबरदारी यावर देखील त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

तसेच, तरुणांनी शेतीकडे वळावे, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरावे, परंपरा टिकवावी आणि नव्या युगातील डिजिटल शेती व अ‍ॅग्रीटेक उपायांचा वापर करून आपल्या क्षेत्रात भरभराट करावी असे आवाहन त्यांनी केले. या शेतकरी मेळावा साठी अनेक शेतकरी व उद्योजक उपस्थित होते.

शेतकरी बांधवांनी देखील त्यांच्या प्रश्नांची विचारणा करत सक्रिय सहभाग घेतला. शंकांचे निरसन करत, प्रशांत गवळी यांनी उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा दिली. शेती ही केवळ पिढीजात परंपरा नसून, ती नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच शेतीबद्दल व शेती व्यवसायाबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत राहू असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version